त्रिपुरा हिंसाचाराचे राज्यात पडसाद

  अमरावती : त्रिपुरा हिसाचाराच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्य़ात अल्पसंख्याक समुदायाच्यावतीने रॅली काढण्यात आली. मात्र रॅली शांततेत जात असतांना अचानक काही आंदोलनकर्त्यांनी दुकानांवर दगडफेक केल्याने रॅलीला गालबोट लावल्याचे दिसून आले. या घटनेची वार्ता संपूर्ण शहरात पसरताच मुख्य बाजारपेठासह इतरही दुकानदारांनी प्रतिष्ठाने बंद केली. शहरात मोठया प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  त्रिपुरा येथे विशिष्ठ समुदायावर अन्याय होत असून त्यांची प्र्थनस्थळे देखील जाळल्या जात असल्याचा आरोप करीत अप्लसंख्याक समुदायाच्यावतीने या घटनेचा निषेध म्हणून रॅली काढण्यात आली. रॅली शाततेत जात असतांना काही तरुणांनी कॉटन मार्केट, चित्रा चौक, चौधरी चौक, बालाजी मंदीर परिसर, यासह अनेक ठिकाणी असलेल्या प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. ज्यामध्ये दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे रॅलीमधील सहभागी तरुणांनी अनेक व्यापार्‍यांची लूट करुन त्याच्या जवळील पैसे देखील हिसकावल्याच्या घटना समोर आल्या. अशाच एका प्रकरणात फूड जैनचे मालक मिलन गांधी यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. रॅली दरम्यान पोलिसांचा कडक बदोबस्त असतांना देखील अशा घडल्यामुळे व्यापार्‍यासह जनसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. भाजपाच्या काही पदाधिकार्‍यांनी बाजारपेठामध्ये दाखल होऊन व्यापार्‍यांचा उत्साह वाढविल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हयात मोठया प्रमाणात पोलिसांचा तडगा बदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ शहरातील अल्पसंख्याक समुदायाच्या वतीने ठिकठिकाणावरुन एकत्रित येऊन मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान मोर्चेकरांनी आरएसएस आणि भाजपाच्या विरोधात नारेबाजी केल्याचे दिसून आले. शहरातील विविध भागातील मुस्लीम समुदाय एकत्रित होऊन या मोर्चा मध्ये सहभागी झाला होता. या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयवर धडक देवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. आमच्यावरील अन्याय थांबवा, अशी मागणी करण्यात आली.

  त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती येथील मुस्लिम संघटनांनी अमरावती शहरात काढलेल्या मोर्चात हिंदू धर्मीय व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून मुस्लिम धर्मीय संघटनेला राज्य सरकारचे पाठबळ असल्याने अफगाणिस्तानप्रमाणे अमरावती येथे हिंसाचार झाला. हा हिंसाचार सरकार पुरस्कृत आहे. आगामी महापालिका निवडणूक तोंडावर आली असल्याने जातीय तेढ निर्माण करून मतांचे ध्रुवीकरण व्हावे अशी अमरावती येथील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची रणनीती आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी दिली आहे.

  काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार राज्यात असल्याने आपले कुणीही काही बिघडू शकत नाही अश्या अविभार्वात जातीय शक्ती अमरावती येथे डोके वर काढत आहे.गठ्ठा मते मिळविण्याच्या नादात आज वरून आदेश असल्याने पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.अमरावती येथे हिंदू सुरक्षित नाही. महाविकास आघाडी सरकारचा निषेध भाजपाच्या वतीने करण्यात येत असून मोर्चेमध्ये हिंसाचार करणार्‍यांवर पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्या नुसार कारवाई करावी, अशी भाजपाची मागणी निवेदिता चौधरी यांनी केली आहे. हिंदूंच्या अंगाला धक्का लागल्यास जशास तसे उत्तर भाजपा देईल, असा इशाराही त्यांनी दिला.


(छाया : संग्रहित)