• Mon. Jun 5th, 2023

जीवनावश्यक वस्तू, दूधवितरण आदींसाठी 2 तासांची मुभा

अमरावती : अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कलम 144 अन्वये संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तू व्यवहारासाठी दुपारी 2 ते 4 या वेळेत 2 तासांची मुभा देण्यात आली आहे. अमरावती शहरातील सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.

शहरातील वातावरण बिघडवणे व अनुचित प्रकाराला जबाबदार व्यक्तींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात 26 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 132 संशयितांना अटक करण्यात आली आहे. समाजमाध्यमांद्वारे चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ नये यासाठी 16 नोव्हेंबरपर्यंत सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

———————-

अमरावती जिल्ह्यात संचारबंदीबाबत सद्य:स्थिती खालीलप्रमाणे आहे.

अमरावती शहर

अमरावती शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन काही वेळेसाठी संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. त्यानुसार दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे आवागमन, दूधवितरण आदी व्यवहार, तसेच शासकीय व निमशासकीय परीक्षा देण्यासाठी पात्र असलेल्या व परीक्षेचे ओळखपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आलेली आहे.

अमरावती जिल्हा ग्रामीण

अंजनगाव सुर्जी शहरात दिनांक 14 नोव्हेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहील. अचलपुर परतवाडा शहर व कांडली देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 पासून रात्री 7 ते सकाळी 7 या वेळेमध्ये संचारबंदी लागू राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *