• Sun. Jun 11th, 2023

खेळाडू..…

तोच असतो खेळाडू खरा

ज्याला गर्व नाही जिंकण्याचा ।
नेहमी राहतो आनंदात
पश्चाताप नाही हरण्याचा ।।
खेळ भावना मनात नित्य
प्रतिस्पर्धी नाही शत्रूसम ।
खेळताना लक्ष खेळाकडे
राखून ठेवणार संयम ।।
सुखचैन त्यागूनिया जातो
घाम गाळण्यास क्रीडांगणी ।
खेळाडूची प्रतिमा वसते
चाहत्यांच्या सदैव लोचनी ।।
खेळ खेळत असाल तर
खेळा बंधुहो मैदानावर ।
द्वेष भावना मनी ठेवून
दोष लावू नका कोणावर ।।
अजु म्हणे खेळा भरपूर
तन मन निरोगी ठेवण्या ।
धनापेक्षा आरोग्यचि हवे
आनंदाने जीवन जगण्या ।।
-अजय रमेश चव्हाण,
तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *