- दि.२८ नोव्हेंबर,२०२१ ला “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले” यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवी प्रा.अरुण बा. बुंदेले यांची “क्रांतिसूर्य महात्मा फुले” ही अभंगरचना वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.- संपादक
- —————————————–
- क्रांतिसूर्य तत्त्व । सत्यधर्म खाण।
- जगात सन्मान। सत्याचाच॥१॥
- महात्मा फुलेंचा। शिक्षण विचार।
- जीवन आधार। आयुष्याचा॥२॥
- संसाराचा घात । मद्य सेवनाने।
- ग्रंथ वाचनाने। सुख शांती॥३॥
- आदर्श शिक्षक । घडवून फुले।
- मन घडविले। विद्यार्थ्यांचे॥४॥
- आदर्श गुरुंचे। फुले तत्त्वज्ञान।
- शिक्षक जीवन। सन्मानित ॥५॥
- महात्मा फुलेंचे। विचार महान।
- घडविले जन। भारतात ॥६॥
- विद्येचे अमृत। बहुजना दिले।
- तयांना तारले। जीवनात॥७॥
- शिक्षणाचा झेंडा। घेऊनिया हाती।
- करीत जगृती। समाजाची॥८॥
- करुनी अर्पण। तन मन धन।
- समाजाचे मन । घडविले॥९॥
- महात्मा फुलेंचा। आज स्मृतिदिन।
- करांनी वंदन । कोटी कोटी॥१०॥
- – प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर,अमरावती
- ४४४६०६ (महाराष्ट्र).
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९.
- Email ID : arunbundele1@gmail.com