- जोपासी जो छंद । छंदामध्ये धुंद ।
- रमतो बेधुंद। कलाकार।।
- रियाज ही भक्ती । कलेची आसक्ती ।
- हीच खरी शक्ती । तया अंगी ।।
- दगड शोधतो । मूर्तीही घडवितो ।
- जीव तो ओततो । निर्जीवात ।।
- कागद पांढरा। ब्रश चा फवारा ।
- चित्र रुपी वारा । नाना रंगी ।।
- सुस्वर भरारी । लावी चाल भारी ।
- गायन सु सरी । सांडी मुखे ।।
- जोडी वाद्य नाती । रमतो संगती ।
- तालात रंगती । वाद्य प्रेमी ।।
- वास्तव,कल्पना । कविता साधना ।
- शब्द आराधना। गीत रूपे ।।
- नृत्य नाट्य आस । साकारतो खास ।
- कलाकृती वास । देई सर्वा ।।
- झालीच दुर्दशा । किती होवो हशा ।
- कला मानी नशा । कलावंत ।।
- -युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता. बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227
Contents hide
(Images Credit : Aachhi khabar)