करावं लागतं …!

    झाडांना काटे असू द्या कितीही
    फुलांना मात्र फुलावच लागतं..!
    गाडीत ओझं असू द्या कितीही
    बैलाला ते ओढावचं लागतं..!
    झाडावर हिरवीगार पाने
    असू द्या कितीही शेवटी
    गळून त्यांना खाली पडावच लागतं ..!
    मनापासून प्रेमासाठी सौंदर्य
    गरजेचं नसतच,
    दहा वेळा चेहरा धुण्यापेक्षा
    एक वेळ मन धुवाव लागतं..!
    निसर्गाचं एक नियम आहे
    दुःख देणाऱ्याला दुःख
    भोगावच लागतं..!
    करा तुम्ही कितीही कोणासाठी
    काही पण….
    त्यांच्यासाठी तुम्हाला शेवटी
    झुरावंच लागतं..!
    दुःख असो कितीही
    आपल्याला…..
    इतरांसाठी मात्र हसावच लागतं..!
    -सुरेश बा. राठोड
    (कलाशिक्षक)
    राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर
    जिल्हा.नागपूर
    9765950144


—–

Thank you for reading this post, don't forget to subscribe!