- आला सण दिवाळीचा
- दीप लावूया अंगणी ।
- सोन पावलाने बघा
- लक्ष्मी येईल सदनी ।।
- सडा सारवण करा
- करा गौरीचे पूजन ।
- जरा विसरून कष्ट
- सौख्य करूया जतन ।।
- भेद गरीब-श्रीमंत
- सारे विसरून जाऊ ।
- लाडू, चिवडा, करंजी
- प्रत्येकांच्या घरी खाऊ ।।
- कोणी जावे वृद्धाश्रमी
- कोणी जावे रुग्णालयी ।
- अनाथांना करा साह्य
- काय जाता देवालयी? ।।
- देव तेथेचि भेटेल
- साफ ठेवा जरा मन ।
- गरिबांचे पुसा अश्रू
- देव होईल प्रसन्न ।
- नका फटाके फोडून
- करू दिवाळी साजरी ।
- लावा पणती सर्वत्र
- स्नेह जागवा अंतरी ।।
- -अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७
—–
Contents hide