• Wed. Jun 7th, 2023

आरोग्य पथकांद्वारे मेळघाटात पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण

    अमरावती : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. आरोग्य पथके जिल्ह्यात सर्वदूर, तसेच मेळघाटातील पाड्यापाड्यांवर पोहोचून पात्र व्यक्तींचे लसीकरण करत आहेत. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून ठिकठिकाणी पोहोचून शिबिरांची पाहणी करण्यात येत आहे. जिल्हाधिका-यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रांजणा येथे लसीकरण शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.

    विविध योजना, उपक्रमांची सांगड लसीकरणाशी घालून मोहिम व्यापक करण्यात आली आहे. या आठवड्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर पार पडण्याची चिन्हे आहेत. अंजनगाव बारी, रांजणा, खिराळा, कु-हा, गणोरी, खडिमल, वलगाव, शिराळा, चंद्रपूर, येवदा, रामतीर्थ, आमला, रेहट्याखेडा अशा अनेक ठिकाणी शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. निरनिराळी कार्यालये, संस्था आदींनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. अंजनगाव सुर्जी बाजार समितीतील सभेला व्यापारी, अडते, हमाल आदींनी हजेरी लावली.

    मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण कार्यक्रम राबवत आहेत. लोकांचे प्रबोधन करणे, लसीकरणाचे महत्व पटवून देणे व लसीकरण आदी कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत आहे. दुर्गम भागापर्यंत पायी पोहोचून पथकांकडून मोहिमेची अंमलबजावणी होत आहे.


—–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *