• Sun. May 28th, 2023

आज दि.२८ नोव्हें २१ ला महात्मा फुले स्मृतिपर्व दिनी प्रबोधनपरव्याख्यानाचे भव्य आयोजन

    क्रांतिरत्न या ग्रंथाचे प्रकाशन व सावित्रीबाई फुले ज्ञानगौरव पुरस्काराचे वितरण

    अमरावती: येथील वऱ्हाड विकास तर्फे राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या 131 व्या स्मृतिपर्व दिनानिमित्त विचारवंत वक्त्यांचे सत्यशोधकीय तत्वावर प्रबोधनपर व्याख्यान आज रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वा.राम नगर येथील सावता सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.तत्पूर्वी आज सकाळी 9 वा. चित्रा चौकातील महात्मा फुले पुतळ्याला आयोजन समिती तर्फे अभिवादन करण्यात येईल.

    याप्रसंगी माहिती व जनसंपर्क विभागाच्या संचालिका अपर्णा यावलकर,प्रा. डॉ. सतीश पावडे,प्रा. डॉ. निशा शेंडे,डॉ. रजिया सुलताना, डॉ. निखिल चांदुरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.कवी प्रा.अरुण बा.बुंदेले “क्रांतिसूर्य महात्मा फुले ” या स्वरचित वंदनगीताचे गायन करणार आहेत.दरम्यान, डॉ. सुनंदा खेरडे यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ज्ञानगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.उपस्थित मान्यवर यांचे हस्ते “क्रांतीरत्न ” महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल.

    सदरील कार्यक्रमाचा लाभ फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी यांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड,स्वागताध्यक्ष नंदकिशोर वाठ, ओमप्रकाश अंबाडकर,प्रसिद्धी प्रमुख ऍड. प्रभाकर वानखडे, प्रा. अरुण बुंदीले,डॉ. उज्वला मेहरे, डॉ. निलिमा उमप,संजय देवळे, गोविंद खवले आदींनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *