- आई आहे तर विश्व भासे सुंदर
- आई आहे तर सौख्याचा अंबर ।
- आई नाम ईश्वराहून प्रिय ज्यांना
- त्यांच्या नामें तिन्ही लोकीं गजर ।।
- सदा सर्वदा आई नाम स्मरावे
- प्रभात समयी तिचे दर्शन घ्यावे ।
- वृद्धाश्रमी तिला स्थान देण्याचे
- कधीच ना आपल्या मनी कल्पावे ।।
- देव असुनी तो आईविना भिकारी
- मग मानवी जीवन आहेच तरी काय? ।
- त्यागूनिया मनीच्या अभिमानास
- नित्यनेमे स्पर्शावे आपल्या आईचे पाय ।।
- प्रेम आईचे आहे सर्वांहूनी पावन
- त्रिभुवनाचा स्वामी करतो तिला नमन ।
- आईच्या प्रेमाला प्राप्त करण्या
- हवेहवेसे वाटते प्रत्येकांना जीवन ।।
- ऋण फेडण्या आईच्या दुधाचे
- अनंत आयुष्य अपूर्णची वाटे ।
- ज्यांना आईचे महत्व कळाले
- त्यांना फुलासम वाटे मार्गातील काटे ।।
- -अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७