Contents hide
माझी या नजरेची
नशा तुला कळावी
कुशीत विसावूनी
रात सारी सरावी
अबोल मुखातील
स्वर गुंज उठावे
गाऊनी गीत प्रिये
कंठी राग लुटावे
अक्षय भावनांचा
मर्म तुला कळावे
साकल्य मन माझे
मनोहर फुलावे
अवखळ मनाचे
क्लेश तू जाणावे
प्रीतीचा गुलकंद
हृदयात रुजावे
आठवणींचा रवंद
सांग किती जपावे
ओढल्या या जखमा
कुठवरी सोसावे
-सुभाष जीवा राठोड (कलाशिक्षक)
दीपचंद चौधरी विद्यालय सेलू
जिल्हा वर्धा
मो.९८२२७०२९७५