Contents hide
अमरावती : अचलपूर, परतवाडा शहर, तसेच ग्रामपंचायत कांडली व देवमाळी परिसरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसा आदेश उपविभागीय दंडाधिकारी संदीपकुमार अपार यांनी जारी केला. त्यानुसार मंगळवार, दि. १६ नोव्हेंबरपासून रोज रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदी कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्रित गोळा होऊ नये, कोणत्याही प्रकारच्या अफवा, जातीय तणाव, धार्मिक भावना भडकवणारे व्हिडीओ, फोटो प्रसारित करू नये. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे बॅनर, पोस्टर लावू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
(छाया : संग्रहित)