Recent in Technology

Advertisement

Breaking News

काव्य गौरव पुरस्काराने नवनाथ रणखांबे सन्मानित

* अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे  ( उत्तर महाराष्ट्र) शाखा नाशिक जिल्हा यांच्या वतीने

    ठाणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे (उत्तर महाराष्ट्र) शाखा नाशिक जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय दहाव्या निमंत्रितांचे काव्यसंमेलन उदघाटक नरहरी झिरवाळ(उपाध्यक्ष-विधानसभा महाराष्ट्र राज्य),संमेलनाध्यक्ष अरुण पवार (गट नेते ना.म.पा), प्रमुख पाहुणे सतिश कुलकर्णी (महापौर नाशिक महानगर पालिका),सुरेश खेताडे (नगरसेवक ना.म.पा), देविदास खडताळे (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, अ.भा.म.सा.प ),प्रा. डॉ . आनंद अहिरे (स्वागताध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अ.भा.म.सा.प.),प्रा. डॉ.विठ्ठल शिंदे (जेष्ठ साहित्यिक, विचारवंत), अण्णा साहेब रोकडे (जेष्ठ समाजसेवक, माजी नगराध्यक्ष कल्याण), प्रा. डॉ. मिलिंद कसबे (साहित्यिक, विचारवंत)नवनाथ पा. गायकर (जिल्हा अध्यक्ष अ.भा.म.सा.प.नाशिक), इ.मान्यवरांच्या उपस्थितित कृष्णामाधव मंगल कार्यालय, दत्त चौक आर टी ओ ऑफिस शेजारी, नाशिक येथे संपन्न झाला.

    यावेळी संमेलनाध्यक्ष अरुण पवार (गट नेते नाशिक महानगर पालिका) यांच्या हस्ते जीवनसंघर्षकार 'नवनाथ रणखांबे ' यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे (उत्तर महाराष्ट्र) शाखा नाशिक जिल्हा यांच्या वतीने मानाचा 'काव्य गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील दहा प्रतिभावंत कवींना काव्य गौरव पुरस्कार गुणवत्ता व प्रतिभेच्या क्षमतेवर देण्यात आल्याचे यावेळी बोलताना प्रा. डॉ. आनंद अहिरे यांनी सांगितले.

    नवनाथ रणखांबे हे कल्याणमध्ये राहत असून ते इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड,ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड,धारक असून त्यांना आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, राज्यास्तरीय, विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या जीवन संघर्ष पुस्तकावर विविध मान्यवरांनी लिहिलेल्या अभिप्राय, परीक्षण आणि समीक्षा यांचा प्रसार माध्यमात ऐतिहासिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम झाला असून त्याची ऐतिहासिक नोंद विविध बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेकडून काव्यगौरव हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code