Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मिसाईल मॅन

  आयुष्यभर सेवा केली
  निस्वार्थपणे देशाची
  सारंच दान करून गेले
  नव्हती हाव कशाची
  गाडी नाही बंगला नाही
  नाही घेतली शेती वाडी
  कपाट भरून पुस्तकाची
  एवढीच शिल्लक माडी
  झोपेत पडणारी स्वप्ने
  खरी कधीच नसतात
  डोळे बंद असतानाही
  झोप लागू देत नसतात
  अग्निपंख पसरूनिया
  अंतरिक्षा गरुड भरारी
  अग्नी एक दोन तीन
  स्वभावच होता करारी
  बहुमोल असा हिरा होता
  होता खरा भारत रत्न
  समजून घ्यावा अब्दुल
  वाचण्याचा करावा यत्न
  भारताचा मिसाईल मॅन
  आझाद देशाचा कलाम
  चला मुलांनो करूयात
  वाचन प्रेरणा दिनी सलाम
  -पी के पवार
  सोनाळा बुलढाणा
  ९४२१४९०७३१
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code