Header Ads Widget

कोजागरी

    चंदनाचा झुला साजे अंबराचा गारवा
    आज पाहू आरशाला पौर्णिमेचा चांदवा
    रात्र ओली पाऊलांची पुनवेची पालवी
    साद घाली राजसाला झुंबराची काजवी
    शुभ्रतेचा साज ल्याला कोरतेचा धुंदवा
    आज पाहू आरशाला पौर्णिमेचा चांदवा
    झिंग आली नभाला या रंगल्या गवळणी
    प्रितीच्या या सुरासंगे भिजल्या अंगणी
    आज ओठी मैफलीला अमृतेचा गोडवा
    माळरानी धुंद गाणी मारव्याचा गंधवा
    आज पाहू आरशाला पौर्णिमेचा चांदवा..
    -धनंजय गव्हाले...
    कवी परिवार सिल्लोड
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या