Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

कास पठार

  पाऊस गेला, थंडावा आला
  पठार माथा, हिरवा झाला
  नटली भूमी, फुलली फुले
  विविध रंगी, चांदणं डुले
  रंगाची जत्रा, भरली रानी
  निसर्ग गातो, आनंद गाणी
  सुवर्ण तेज, पडता अंगी
  खुलते तेज, अनेक रंगी
  लहर येता, खेळती झोका
  गळ्यात गळे, साधती मोका
  पठार कास, सौन्दर्य दान
  भूमीचा स्वर्ग, दिसतो छान
  -युवराज गोवर्धन जगताप
  काटेगाव ता.बार्शी
  जिल्हा सोलापूर
  8275171227
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code