Header Ads Widget

कशी करू मी दिवाई ?

    ऊडिद गेला मूंग गेला
    गेल सोयाबीन वाहून
    धाय धाय रडे गा धनी
    काया वावराले पाहुन !!
    हीरव्या पर्हाटीले त्याच्या
    फुल बोंडया नाही गा आल्या
    अर्ज विनंत्या कंपनीले
    त्याच्या साऱ्याच वाह्या गेल्या !!
    वरून आस्मानी कहर
    खाली कहर सरकारी
    लचके दलाल तोडती
    झाले बेईमान व्यापारी !!
    राबराबलो रानात
    नाही दिसला विकास
    डोई वाढल रे कर्ज
    बाकी भकास भकास !!
    सण दसरा,दिवाई
    कसा तोंडावर आला
    अवकाली पावसान
    कसा घास कडू केला !!
    कशी करू मी दिवाई
    काय सांगू मी लेकीले ?
    कशी घालू दिवाईची ?
    ओवायनी बहिणीले !!
    बिना तेलाची पणति
    कशी पेटवू दारात ?
    सांग सांग साई देवा
    दिवा पेटिल काय पाण्यात ?
    वासुदेव महादेवराव खोपडे
    सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
    अकोला
    9923488556
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या