Recent in Technology

Advertisement

Breaking News

दिवाळी

    दिवाळीची लगबग
    बघा झाली सुरू
    यंदा थोडी वेगळीच
    दिवाळी साजरी करू
    गरीब व्यापाऱ्यांकडून
    पणती घेऊ मातीची
    कौतुक करून थोडेसे
    रुपये दोन देऊ जास्तीची
    रुचकर फराळ सुद्धा
    करु जास्तीचा वाढवून
    अनाथ आश्रममध्ये जाऊ
    पॅकेट्स फराळाचे घेऊन
    लाजू नका वस्तू घ्यायला
    जेष्ठ किंवा गरीबाकडून
    एक तिथे दोन वस्तू नक्की
    खरेदी करू आवर्जून
    प्रदूषण यूक्त फटाके
    यंदा घेणे मुद्दाम टाळावे
    त्याच पैशाचे मदतीचे दान
    गरीबाच्या पदरी टाकावे
    आकाशकंदील होऊनी
    इतरांसाठी उजळून जाऊ
    गोरगरिबांच्या दिवाळीचे
    आपण मात्र निमित्त होऊ
    - आम्रपाली घाडगे
    मिरा रोड, मुंबई
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code