Header Ads Widget

सहायक संचालक (माहिती) गजानन कोटूरवार यांना निरोप; अपर्णा यावलकर यांनी कार्यभार स्वीकारला

    अमरावती: विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक गजानन कोटुरवार यांची पदोन्नतीने बदली झाल्याने कार्यालयातील सहका-यांतर्फे त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी सहायक संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.

    श्री. कोटुरवार हे पदोन्नतीने बुलडाणा येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रूजू झाले आहेत. कार्यालयातील सहका-यांतर्फे भेटवस्तू, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. प्र. उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, नूतन सहायक संचालक श्रीमती यावलकर, माहिती सहायक पल्लवी धारव आदी उपस्थित होते.

    श्री. कोटुरवार यांनी अमरावती येथे उत्तम कार्यभार सांभाळला. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्वांनी मनोगताद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या. नूतन सहायक संचालक श्रीमती यावलकर यांचे सर्व सहका-यांतर्फे स्वागत करण्यात आले. श्रीमती यावलकर यापूर्वी नागपूर येथील संचालक कार्यालयात कार्यरत होत्या.

    यावेळी लेखापाल विजया लोळगे, प्रदर्शन सहायक हर्षदा गडकरी, वैशाली ठाकरे, कॅमेरामन नितीन खंडारकर, छायाचित्रकार मनीष झिमटे, कुमार हर्दुले, वरिष्ठ लिपीक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, सुनील काळे, दिनेश धकाते, रूपेश सवाई, रवींद्र तिडके, विजय आठवले, गणेश वानखडे, सुधीर पुनसे, गजानन पवार, दीपाली ढोमणे आदी उपस्थित होते.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या