Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

जगाचा बाप मेला

  निसर्गाची अवकृपा
  पाऊस आला खूप
  नदीनाले भरुन गेले
  दिसे विनाशाचं रुप
  हातातोंडाशी घास आला
  हिरावून नेला
  आक्रोश करुन करून
  जगाचा बाप मेला
  जिथं जिथं शेतामंदी
  गुडघा गुडघा पाणी
  हसणाऱ्या बापाची
  करुण झाली वाणी
  वाढलेल्या ताटावरुन
  उठवून गेला
  आक्रोश करुन करून
  जगाचा बाप मेला
  लागून बसलं पानी
  पऱ्हाटीचे सडले बोंडं
  शैतकऱ्याच्या नशिबात
  कायम असतात धोंडं
  कंबरभर पाण्यामंदी
  बुडवून गेला
  आक्रोश करुन करून
  जगाचा बाप मेला
  नजर जाईल तिथपर्यंत
  पानी लागलं वाहू
  सोयाबीन त्याच्यामंदी
  आता लागलं पोहू
  थंड्या थंड्या तेलामंदी
  कडवून गेला
  आक्रोश करुन करून
  जगाचा बाप मेला
  सततच्या पावसानं
  फुटून गेले कोंबं
  कोनाच्या म्होरं आता
  कशी मारु बोंबं
  कर्जाच्या चिखलामंदी
  मढवून गेला
  आक्रोश करुन करून
  जगाचा बाप मेला
  वावराकडं पाहून येती
  या डोळ्यामंदी आसू
  अस्मानी सुल्तानी ताप
  जीवन लागलं नासू
  धपाटे घालुन पाढा
  पढवून गेला
  आक्रोश करुन करून
  जगाचा बाप मेला
  -पी के पवार
  सोनाळा बुलढाणा
  ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code