Header Ads Widget

शिक्षणोत्सव...!

  दिड एक वर्षानंतर
  गजबजून गेल्या शाळा
  हळूहळू थोडं थोडं
  बोलू लागला फळा
  उत्साहाला उधाण आले
  किलबिल झाली सुरू
  शिकवायला तत्पर झाले
  साऱ्या शाळेतील गुरू
  कोमेजलेल्या मुखावरती
  आली गोड हसरी लाली
  मित्रा समवेत हसतांना
  उमटे गोड खळी गाली
  वही पेन पेन्सिल दप्तर
  आणि लगबग झाली सुरू
  शिकवायला तत्पर झाले
  साऱ्या शाळेतील गुरू
  प्रकाशाची वाट दिसली
  संपून गेली काळ रात्र
  पायरीवरती शाळेच्या
  मुलांचे दाटून आले गात्र
  प्रतिक्षेचे दिवस गेले
  पालक लागले घाई करू
  शिकवायला तत्पर झाले
  साऱ्या शाळेतील गुरू
  अंधाराच्या युगाचा
  झाला आज अस्त
  हसत खेळत बागडताना
  फुले उमललेली मस्त
  गोल गोल रिंगण करून
  आनंदाने नाचू फेर धरू
  शिकवायला तत्पर झाले
  साऱ्या शाळेतील गुरू
  हसत खेळत उत्साहाने
  चालू करू आता ध्यान
  बंद झालेल्या पुस्तकाचे
  हळुहळू उघडू पान
  मास्क अन् सॅनिटाईजर
  वापरु, दुरुन गोष्टी करू
  शिकवायला तत्पर झाले
  साऱ्या शाळेतील गुरू
  नको नको त्या दुषणांचा
  पडला होता पाऊस
  शिक्षकांना कधीच नव्हती
  घरी राहण्याची हावूस
  सहनशील प्राणी आहे
  त्याची थट्टा नका करू
  शिकवायला तत्पर झाले
  साऱ्या शाळेतील गुरू
  -पी के पवार
  सोनाळा बुलढाणा
  ९४२१४९०७३१
(Images Credit : Tarun Bharat)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या