Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

उड पाखरा उड...!

  उड पाखरा उड उंच आभाळी
  तुला उंच उडावच लागेल.
  नाही घेतली उंच भरारी,
  तर तुला भूतलावर पडाव
  लागेल.!
  भूतलावरची माणस आहे
  दुष्ट फार, येशील खाली
  गिळंकृत करतील तुला
  उघडे पडतील बाळ सारे
  म्हणुनी....
  तुला आपल्या पिलांना
  हृदयाशी जपावे लागेल..!!
  सोसिलास उन वारा
  पसरुनी पंख पिसारा,
  चोचीत पिलांना भरविले घास
  नयनात तुझ्या अश्रूच्या धारा,
  फिरुनी सारा शेत शिवारा,
  आतुनी दुःखी
  पिलांना .....
  बळ यावं यासाठी तुला
  हसावच लागेल...!!!
  झिजलाश तू परी तुझ्या पिलासाठी. फुटलेत त्यांना
  पंख आता....
  उडूनी गेले तुला सोडूनी दुरी,
  नाही कोणी आता घरी ना दारी
  शेवटी स्मृतींना घेऊनी उरी,
  जाशील किती उडूनी दुरी
  एका क्षणाला भू गर्भात तुला
  विसावा घ्यावाच लागेल.
  उड पाखरा उड उंच आभाळी
  तुला उडावच लागेल....!!!!
  -सुरेश राठोड
  (कलाशिक्षक)
  राष्ट्रीय विद्यालय, भिवापूर.
  जि. नागपूर
  9765950144

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code