अमरावती : सोशल मिडिया चा वापर करत असताना आपण आपली काळजी घेणे खुप गरजेचे आहे असे मत सकाळ माध्यम समूह यंग इंस्पिनेटर्स नेटवर्क व अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सुरक्षा आँनलाईन वेबिनार कार्यक्रम मध्ये पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना व्यक्त केले.
पुढे बोलत असताना ते म्हणाले कि आपण जेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम चा वापर करतो, तेव्हा अनेक अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट आपल्याला येतात आणि आपण विचार न करता फोलोवर्स च्या नादात त्या स्विकारतो अशी अनोळखी व्यक्ती मग आपल्या प्रोफाईल च्या माध्यमातून सर्व माहिती घेतो आणि मग आपल्याला ब्लँकमेलींग करतो, त्यामुळे अशा अनोळखी व्यक्तीचा रिक्वेस्ट स्विकारायचा नाही असा सल्ला सुध्दा महाविद्यालयीन तरुणांना दिला, तरुणींना जर फेसबुक च्या माध्यमातून जर धमक्या वगैरे आल्या तर त्यांनी नघाबरता त्वरीत तक्रार दाखल करायची असे सुध्दा सांगितले यावेळी अमरावती ग्रामीण सायबर गुन्हे शाखेचे विरेंद्र चौबे व त्यांची टिम सागर धापड,सागर भटकर, आशिष भांबुरकर यांनी आपल्या सायबर क्राईम व्हिडिओ च्या माध्यमातून सादरीकरण करून महाविद्यालयीन तरुणांना माहीती दिली.
यावेळी या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा विकास देशमुख वसंतराव नाईक महाविद्यालय धारणी,प्रा डॉ अशोकराव भोरजार नारायणराव देशमुख महाविद्यालय चांदुरबाजार,प्रा डॉ राजकुमार दासरवाड समाजकार्य महाविद्यालय बडनेरा,प्रा डॉ प्रशांत विघे भारतीय महाविद्यालय अमरावती,प्रा डॉ नरेश इंगळे शंकरबाबा महाविद्यालय पिंपळखुटा,प्रा श्रीधर मेंढे पि आर पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती,प्रा आशिष कान्हु कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा,प्रा निशांत जयस्वाल विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्वा मानेकर यांनी तर आभारप्रदर्शन ललाक्क्षी मालविया यांनी केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या