Recent in Technology

Advertisement

Breaking News

आस्थापना, कार्यालयांत ‘नो मास्क नो एन्ट्री’चे फलक लावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

    अमरावती : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने संचारबंदीत शिथीलता येऊन अर्थचक्रास चालना मिळाली. तथापि, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुढील काळातही आस्थापना, उद्योग व कार्यालयांत मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला.

    शासकीय, निमशासकीय, खासगी, औद्योगिक आस्थापना व कार्यालयांत कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांनी, तसेच कार्यालयात येणा-या अभ्यागतांनी नाक व तोंड पूर्ण झाकले जाईल, असा मास्क वापरावा. सर्व कर्मचा-यांचे दोन्ही मात्रांत लसीकरण झाल्याची खातरजमा आस्थापनाप्रमुखाने करावी व तसे प्रमाणपत्र त्यांच्याकडून मिळवावे. काही अडचण असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधून लसीकरणाचे विशेष सत्र घ्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

    मास्कचा वापर व लसीकरण या बाबींसाठी कार्यालयाप्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील आस्थापना अधिका-यांना नामनिर्देशित करावे. नामनिर्देशित अधिकारी यांना विनामास्क वावरणा-यांना दंड करण्याचे अधिकार असतील. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, अभ्यांगत यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक्षक उमेश खोडके, नायब तहसीलदार जी. जी. कडू, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाख वाहुरवाघ यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. विनामास्क आढळणा-यांवर 200 रूपये दंडाची आकारणी करून ती रक्कम कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिका-यांकडे जमा करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

    ‘नो मास्क नो एन्ट्री’चे फलक लावा

    सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये आवारात, तसेच दर्शनी भागात ‘नो मास्क नो एन्ट्री’चे फलक लावण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. विनामास्क येणा-यांना प्रवेश देऊ नये, असेही आदेशात नमूद आहे.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code