Recent in Technology

Advertisement

Breaking News

अमरावती बेलोरा विमानतळासाठी ७५ करोड रुपये मंजूर-नवणीत रवी राणा

    * केंद्र सरकारने राज्य शासनाच्या कडून मागितले बेलोरा विमानतळबाबत लेखाजोगा उपयोगिता प्रमाणपत्र.

    अमरावती : खासदार नवनीत रवी राणा यांनी बेलोरा विमानतळासाठी लोकसभा सभागृहांमध्ये आवाज उठवून बेलोरा विमानतळाचें काम सुरू करण्यासाठी व कामांची गती वाढवण्यासाठी निधीची मागणी केली होती व तसेच उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया यांचेकडे निधी मागणीचे पत्र देऊन काम तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी खासदारांचे मागणीला केंद्र सरकारने प्राधान्यक्रम देऊन खासदार नवनीत राणा यांचे त्यांनी केलेली मागणी विचारात घेऊन माननीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया यांनी 75 करोड रुपये उड्डाण योजनेअंतर्गत मंजूर केले असल्याचे पत्र पत्र क्रमांक ३१०१४/८५/२०२१डीटी-२५६०-एफ दिनांक १८ ऑक्टोबर२०२१ रोजि खासदार नवनीत राणा यांना पाठविले सोबतच हे मंजूर 75 करोड रुपये राज्य सरकारला पाठविन्यापूर्वी राज्य सरकारने बेलोरा विमानतळ येथिल यापूर्वी केलेल्या कामाचे व रकमेची उपयोगिता प्रमाणपत्र राज्य सरकारकडून भारतीय विमान प्राधिकरण या एजन्सीला पाठविण्याचे पत्रात निर्देश दिले आहे.

    केंद्र सरकारकडून खासदार नवनीत रवी राणा यांनी एवढा मोठा निधी मंजूर केला आता विधानसभा सदस्य म्हणून राज्य सरकारकडे उपयोगिता प्रमाणपत्र देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे या संबंधाने आमदार रवी राणा यांनी सुद्धा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला असल्याचे त्यांचे कार्यालय सचिव उमेश ढोणे यांनी सांगितले लवकरच बेलोरा विमानतळावरून हवाई फेऱ्या सुरू करण्यासाठी सातत्याने खासदार व आमदार राणा प्रयत्नशील असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code