ठाणे : भारतातील सर्वात मोठ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन (अपर जिल्हाधिकारी, ठाणे ) वैदेही रानडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकरी , ठाणे समिती सभागृहमध्ये , जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न झाला. यावेळी (निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे)
सुदाम परदेशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथात कवितांचा सामावेश असणारे ठाणे जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत, प्रा. डॉ. माधव गवई, प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, रामचंद्र जंगले, जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे आणि इतर अमर नवघरे, मोहन गुहे, सोनाजी वावळकर इ. मान्यवर उपस्थित होते.
महामानव महाग्रंथामध्ये २०२१ कवींच्या २०२१ कवितांचा समावेश आहे. या महाकाव्य ग्रंथाचे संपादन साहित्यिक प्रा. अशोककुमार दवणे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भारतातील हा सर्वात मोठा संपादित महाकाव्यग्रंथ आहे.
"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महा काव्यग्रंथ प्रा. दवणे यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. आणि आज रोजी सर्व जिल्ह्यामध्ये ११ विध्यापिठामध्ये एकाच दिवसी प्रसिद्ध होत आहे. आता मला जशी माहिती मिळाली, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद होण्यासाठी हा चाललेला आहे. यासाठी आपणास शुभेच्छा देते. आणि ज्यांनी हे खूप परिश्रम घेऊन संकलन केलं पुढच्या पिढीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे महाकाव्य ग्रंथ उपलब्ध होईल त्यासाठी मी संकलन करणाऱ्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करते. असे आपले मत वैदेही रानडे (अपर जिल्हाधिकारी) यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ प्रकाशन केल्यानंतर यावेळी बोलताना व्यक्त केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या