Header Ads Widget

लाज वाटते...!

    चार वर्षाच्या मुली पासून
    सत्तर वर्षांच्या म्हातारीवर
    स्वत:च्याच लेकी पासून
    तर शेजारच्याही सुनेवर
    जेव्हा तुझी नजर जाते
    शरम कर भल्या माणसा
    तुला माणूस म्हणायची
    लाज वाटते
    भिरभिरते का ? नजर तुझी
    तुझ्यातला दानव जागा होतो
    खेळत्या वयातील लेकराचा
    अमानुषपणे तु चावा घेतो
    तेव्हा वासना बेभान होते
    शरम कर भल्या माणसा
    तुला माणूस म्हणायची
    लाज वाटते
    गर्दी झाली मोका मिळतो
    तरुण लेकी बाळींना छळतो
    एस टी रेल्वे धार्मिक स्थळ
    आत्मसन्मान तुझा ढळतो
    तेव्हा नजर चोरटी वेध घेते
    शरम कर भल्या माणसा
    तुला माणूस म्हणायची
    लाज वाटते
    इकडून कुचके तिकडून कुचके
    हात तुझे का ? थरथरत नाही
    डोळे मिटून मांजरीचे दूध पिणे
    आपल्याला कोणी पाहात नाही
    तेव्हा सहनशीलतेच्याही पार होते
    शरम कर भल्या माणसा
    तुला माणूस म्हणायची
    लाज वाटते
    असहाय्य असते अबला कधी
    भ्रमर वळवळतो रे मना मंधी
    फायदा घेण्या तु स्वार होतो
    मिळते तुला आयतीच संधी
    तेव्हा मानवता येथे ठार होते
    शरम कर भल्या माणसा
    तुला माणूस म्हणायची
    लाज वाटते
    तुझी बायको तुझी बहिण
    आपले वागणे जसे असते
    परक्या घरच्या लेकी बाळी
    याचे तुला का? भान नसते
    तेव्हा बुध्दी का? गहाण जाते
    शरम कर भल्या माणसा
    तुला माणूस म्हणायची
    लाज वाटते
    -पी के पवार
    सोनाळा बुलढाणा
    ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या