Recent in Technology

Advertisement

Breaking News

हरितक्रांतीसोबत जैविकक्रांती एक महत्वपूर्ण उपक्रम : डॉ. प्रकाश राठोड

    भंडारा : भंडारा जिल्हातील साकोली तालुक्यातील शिवणी बांध या गावातील शेतशिवार परिसरात अभ्यासू, प्रयोगशिल,बि.एस्सी.कृषि पदवीधारक ग्रामसेवक श्री. रमेश झोडे हे स्वतः शेती करतात.वडीलोपार्जित शेतीतच निसर्गरम्य परिसरात कुंटूबासह वास्तव्य करतात. आपल्या शेतात विविध प्रयोग अनेक वर्षापासून करतात.विशेष म्हणजे आज रासायनिक खत औषधीने मातीचे आरोग्य, मानवांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडत असताना

    " विषमुक्त अन्न - आरोग्यसंपन्न परिवार"

    " मातीचे आरोग्य - सर्वांचे आरोग्य"

    या सत्यक्रांतीच्या सादीला साद घालत बायो एफ या शासनाद्वारा प्रमाणीत शंभर टक्के जैविक खताचे प्रयोग मागील वर्षापासून करतात. मिरची, धान, तूर इत्यादी पिकांवरील प्रयोगाने ते समाधानी असून खर्चात बचत, उत्पन्नात वाढ आणि कडक झालेली शेतजमीन सुपिक आणि भुसभुसित होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या अनुभव आणि प्रयोगाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भंडारा जिल्हयांतील शेकडो शेतकऱ्यांनी जैविकशेतीकडे वळलेले असून सत्यक्रांतीद्वारा जिल्हाभर जैविकशेती विकास अभियान राबविण्यात येणार असल्याचे मुख्यसंयोजकाद्वारे समजले. नुकताच नागपूरहून प्रसिद्ध साहीत्यिक, तांडा सुधार समितीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड, महासचिव नामा बंजारा, कोषाध्यक्ष इंदल पवार, प्रा. मोहन जाधव सत्यक्रांतीचे श्रीपत राठोड होते.

    सदर अभ्यास दौऱ्यांतील प्रत्यक्ष शेतीवरील चर्चासत्रात या विषयांतील उच्चविद्याविभूषित शास्त्रज्ञ श्री. प्रमोद पर्वते, श्री. रमेश झोडे, श्री. हंसराज झोडे, लोहारा येथील उत्साही तरुण शेतकरी श्री. राजेश मेंढे, भंडारा जिल्हा जैविक शेती विकास अभियानचे मुख्य संयोजक श्री. धर्मेश सहारे, जैविकशेती विकास प्रचारक श्री. जितेंद्र जनबंधू यांचा प्रामुख्याने पुढाकार होता. प्रश्नोत्तरांवर आधारीत प्रत्यक्ष शेतीच्या बांधावरील चर्चासत्रात मातीचे आरोग्य, शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीवर उपाय, रासायनिक शेतीचे गंभीर दुष्परीणाम या सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी जैविकची गरज आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतातील मनोगत हे विशेष करून फार मोठा सकारात्मक आशावाद निर्माण करणारा प्रेरणादायी, चिंतनात्मक आणि दिशादर्शक ठरला. हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांनी सुरू केलेल्या हरितक्रांतीसोबत आता जैविकक्रांतीची अत्यंत गरजेचे असल्याचे प्रसिद्ध साहीत्यिक डॉ. प्रकाश राठोड यांनी याप्रसंगी आवर्जून प्रतिपादन केले.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code