Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

अशोक विजया दशमी !

    हे क्रांतीभूमी..!
    धम्मचक्र प्रवर्तनदिन
    आम्ही दरवर्षीच
    साजरा करतोय,
    अशोक विजया दशमीला
    14 आँक्टोबर 1956 दिनी
    आम्ही बौद्ध झालो
    तेव्हापासून आजतागायत
    तू आमच्यासाठी
    उजेडाचं झाड झालीस,
    विज्ञानवादी विचारांची
      सावली झालीस दीक्षाभूमी !
      तुझ्या कुशीत विसावतांना
      माणुसकीची महाऊर्जा मिळते
      जातांना प्रज्ञेची शिदोरी
      डोक्यात घेऊन जात असतो
      तुझी प्रेरणा डोक्यात आहे तोवर
      परिवर्तनशील
      मार्गानेच प्रवास करीत असू
      पुन्हा गत काळोखाच्या
      मार्गावर कधीच वळणार नाही ...!
      आमचं टकुरं कुणी कितीही
      फिरविलं ,तरी आता ते फिरत नाही
      बुद्ध- भीमाचे परिवर्तनशील विचार सोडून
      आता आम्हाला दुसरं काहीच कळत नाही !
      आता तुच आमची प्रेरणा
      तुच जगण्याची ऊर्जा
      तुच आमची युद्धाशाळा
      आणि तुच आमची क्रांतीज्वाळा,
      धम्मचक्र प्रवर्तन हेच
      आम्हास मिळालेलं महादान आहे !
      अरुण विघ्ने
    -----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code