Header Ads Widget

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा आता 24 ऑक्टोबरला

    अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन आता 24 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आले आहे .सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

    यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेतून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एनसीईआरटी ( NCERT) नवी दिल्ली यांच्यामार्फत 13 जून रोजी घेण्यात येणार होती. तथापि कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा आता 24 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे एनसीईआरटी, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी , असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या