अमरावती :श्री संत गुरु रविदास महाराज अध्यसन केंद्र श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये सुरु करण्यासाठी श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था,अमरावती या संस्थेतर्फे दि.१० आँक्टोबर,२०२१ ला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरु मा.डाँ.दिलीप नामदेवराव मालखेडे यांना निवेदन देण्यात आले.
कुलगुरु मा. डाँ.दिलीप नामदेवराव मालखेडे यांचे सर्वप्रथम शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन संस्थाध्यक्ष श्री अनिल भागवतकर ,प्रा.अरुण बा. बुंदेले , कृष्णा मोहोकर,गणेश भागवतकर, दिनेश भागवतकर,रमेश भटकर,गोपाल चंदन,संजय वानरे,संजय गव्हाळे,दिनेश चापके,डाँ.नंदकिशोर खंडारे,राजेंद्र ढाकरे,पांडुरंग खंडारे,राजेश शेगोकार,रमेश गवई इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केले. प्रा.अरुण बुंदेले यांनी त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला"निखारा" हा काव्यसंग्रह कुलगुरुंना सस्नेह भेट दिला.
श्री संत गुरु रविदास महाराज अध्यसन केंद्र सुरु करण्यासाठीचे निवेदन कुलगुरुंना देताना ,विद्यापीठामध्ये श्री संत गुरु रविदास महाराज अध्यसन केंद्र सुरु करण्याची आवश्यकता प्रा .अरुण बुंदेले यांनी प्रतिपादन करून सं.गा.बा.अमरावती विद्यापीठाच्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च कुलगुरू पदी पोहोचलेले सक्षम,जिज्ञासू आणि विद्वान व्यक्ती मा.डाँ.दिलीप नामदेवराव मालखेडे आज समाजासाठी भूषण ठरलेले अाहेत,याचा समाजातील प्रत्येक व्यक्तीला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या