जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून आदेश जारी
अमरावती : ब्रेक द चेनअंतर्गत शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व प्रकारची धार्मिक स्थळे, पूजा करण्याची ठिकाणे, प्रार्थनास्थळे गुरूवारपासून (7 ऑक्टोबर) सार्वजनिकरीत्या खुली होणार आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला.
अशा सर्व ठिकाणी मास्क परिधान करणे, सॅनिटायझर, देहदूरी पाळणे आवश्यक असून, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी संबंधित ट्रस्ट, बोर्ड, यंत्रणेमार्फत तापमान तपासणी सुविधा, सॅनिटायझर आदी बाबींची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील. 65 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांनी शक्यतोवर घरातच राहावे. प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनाने त्याबाबत नागरिकांना सूचित करावे. धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे येथील कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांच्याकडून दक्षता नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे आदेशात नमूद आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या