Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

तोंडोळी

    सभ्य वाटणाऱ्या माणसात
    लपलेला असतो चोर
    महिला भगिनींवर अत्याचार
    कसे माघारतील दरोडेखोर?
    दागदागिने पैसा अडका
    चोरला संसार केला ध्वस्त
    माय भगिनींच्या किंकाळ्या
    इभ्रत करून गेले उध्दवस्त
    घरात नसेल का?पोर बहिण
    माय आठवली नसेल का?
    कुठवर लांडग्यांनी लचके तोडावे
    भावनेची तरी जरब बसेल का?
    बेताल विकृत शस्त्रांचा नंगानाच
    मेंदूवर मद्याचा असावा अंमल
    कुठल्या थराला जातोय आपण
    आवरायला नसेल का जमल?
    कोणत्या तोंडाने म्हणायचं
    अत्याचारी माणसेच होती
    कधी समजेल नराधमांना
    जपली पाहिजे दुरची नाती
    आठवून गेली कोडेवाडी
    तोंडोळीशी सामना झाला
    असल्या नराधमांच्या प्रवृत्तीवर
    कधीतरी लागेल काहो ताला
    पी के पवार
    सोनाळा बुलढाणा
    ९४२१४९०७३१
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code