Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मायबाप

  तुयासाठी मायबापानं
  आयुष्यात केली मरमर
  तुयीचं सारी होती कायजी
  आयुष्य निंगूंन गेलं झरझर
  बिमार तु रायस बाबू
  डोयाले डोया नसे
  भूकतान का काजून
  डोये वटारून बसे
  आता त्याहीच्या जीवाची
  संध्याकाय झाली बाबू
  हातपाय थरथराय लागले
  आता रायलं नाई काबू
  मायबापाचे पाय बनून बाबू
  तु आधार त्याहीचा होजो
  बनून हात त्याहीचे
  तु तोंडात घास देजो
  तोंडातल्या दातायनं
  कवाच घेतली सुट्टी
  दातायनं घासासंग
  घेऊन टाकली कट्टी
  मनून त्याच्यासाठी बाबू
  तु दात बनून पायजो
  आधार घेऊन खलबत्त्याचा
  तु कुटून खावू घालजो
  आंघोयीले बसन तवा
  तोल जाईल त्याहीचा
  निसटून जाईल हातातून
  मग्गा घेतला पान्याचा
  हातात साबू घेऊन बाबू
  आंघोय करून देजो
  लोकं हासतील मनून
  लाज बाजुले ठेवजो
  सोता उभं राहून कपडे
  घालता येनार नाई
  पायातली वहानबी
  बसवता येनार नाई
  लेकरं तुहे समजून बाबू
  तु कपडे चढवून देजो
  बुट घालून देतं तसंच
  चप्पलबी घालून देजो
  म्हतारपन मोठं इचित्र
  सुटते त्याहीले बडबड
  खरी गोम इथंच हाय
  होतच असते गडबड
  लान लेकरू समजून बाबू
  बोबडे बोल तु बोलजो
  बायकोले सांगजो समजून
  नाकान कांदा नको सोलजो
  पायना बांदला तुयासाठी
  पायना गीत त्याहीनं गायलं
  डोये उघडे हाये का? बंद
  झोपीतून उठून पायलं
  जमलंच तर मनतो बाबू
  पायना बनवून तु घेजो
  लेकरु तुवं समजूनच
  झोके त्याहीले तु देजो
  सारं काई भेटन राजा
  मायबाप भेटनार नाई
  इतंतितं फिरुन पायशीन
  सरवीकडं दिशा दाही
  तेरवी नको करु बाबू
  पिंडदान नको करजो
  मेल्यावर सारं करन्यापक्षा
  जितेपनीच खायले घालजो
  पी के पवार (शिक्षक)
  सोनाजी महाराज हायस्कूल
  सोनाळा
  ता संग्रामपूर जि बुलढाणा
  ९४२१४९०७३१
(Images Credit : Lokmat)

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

goverdhan म्हणाले…
आदरणीय पवार सर अप्रतिम अशी ही कविता समाजासाठी आरसा झाली आहे आपले खूप खूप अभिनंदन

People

Ad Code