Header Ads Widget

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 31 ऑक्टोबरला

    अमरावती , दि. 12 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 आता 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. यापूर्वी ही परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे दोन्ही परीक्षांना उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे नुकसान होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आला आहे

    सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढण्याची मुदत 14 ते 31 ऑक्टोबरपर्यंत राहील . तसेच शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर 31 ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत राहील . त्यानंतर दुसरा पेपर दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी , असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या