Header Ads Widget

आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली सतीश उमाळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट !

    मोर्शी : मोर्शी चांदुर बाजार मार्गावर खानापूर येथील मोर्शी तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक लिपिक सतीश उमाळे सकाळी व्यायाम करत असतांना मोर्शीवरून चांदुरबाजार मार्गे जाणाऱ्या ट्रक चालकाचे धुक्यामुळे नियंत्रण सुटून व्यायाम करणाऱ्या सतीश उमाळे यांना ट्रकची जोरदार धडक दिल्यामुळे या अपघातात सतीश उमाळे यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाल्यामुळे उमाळे कुटुंबावर दुःखाच डोंगर कोसळला.

    सतीश उमाळे यांच्या निधनानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वर्गीय सतीश उमाळे यांच्या निवासस्थानी उमाळे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबीयांची आस्तेने विचारपूस करत संवाद साधला.यावेळी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, त्र्यंबकराव उमाळे, आकाश नागपुरे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या