Recent in Technology

Advertisement

Breaking News

नागपूर येथे " गोरमाटी शेतकरी चर्चासत्र आणि सत्कार कार्यक्रम संपन्न.,,

    नागपूर : 2 ऑक्टोबर 2021 रोजी ठिक 12 वाजता गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्यमनिष नगर, नागपूर येथे " वसंतराव नाईक परसबाग, आणि "संत सेवालाल क्रांती साधना केंद्र,या ठीकाणी शेतकरी चर्चासञ आणि सत्कार कार्यक्रम पार पडले.

    जैविकक्रांती काळाची गरज या विषयावर चर्चा करण्यात आली मा.श्रीपतभाऊ राठोड व सौ.जयश्रीताई राठोड यांनी "ध्यास सुपिक मातीचा -ध्यास शेतकरी विकासाचा. घेवून आपल्या टेरेसवरती निर्माण केलेले आरोग्यदायी बगिचा मध्ये अनेक प्रकारचे वनौषधी,भाजीपाला पिके, आरोग्यदायी तुळस, गवतीचहासह अनेक घटक लावून छोटास्या जागेत एक प्रकारचे आरोग्य मार्गदशन केंद्र निर्माण केला आहे.विना केमिकलचे शंभर टक्के जैविक फळे, पालेभाजी पाहण्यास मिळाली. शिवाय फिरण्याचे ट्रॅक, योगासनाचे ठिकाण, ध्यानकेंद्र, सूर्यस्नान पांईट असे बरेचकाही दिशादर्शी उपक्रम.... खंर तर श्रीपतभाऊ आणि जयश्रीताई यांचे जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच पडते असे कार्य. "परसबाग ज्यांचे घरी -आरोग्य तिथे वास करी. यासोबत "विषमुक्त अन्न-आरोग्यसंपन्न परिवार. या संकल्पनेसोबत जैविकशेती विकास अभियान संयोजक श्रीपतभाऊ राठोड व सौ. जयश्रीताई राठोड यांचे कार्य जनकल्याणकारी आणि अत्यंत गरजेचे असल्याचे प्रकर्षाने संर्वांना जाणवले आणि मनापासून आवडले.टेरेसवरिल आरोग्यदायी बगीचा पाहून सर्वजन भारावून गेले हे विशेष...!

    शिवाय वसंतराव नाईक, संत सेवालात महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांनी सर्वांमध्ये सामाजिक उर्जा संचरत होती. "मारे देशेम देशेम...या श्रीपतभाऊ राठोड लिखीत सौ. जयश्रीताईच्या सुमधुर आवाजातील अर्थपूर्ण गिताने शेतकऱ्यांचे दुःख आणि वसंतराव नाईक यांचे कार्याचे महत्व लक्षात आणून दिले. आजच्या गोरमाटी शेतकरी चर्चा सञाचे अध्यक्ष आत्माराम चव्हाण साहेब, नायक, नागपूर व उदघाटन शालकजी राठोड, कारभारी, नागपूर प्रगतशील शेतकरी आर. डी. जाधव, दुलसिंग राठोड, बी. आर. राठोड व ईतर बरीच मान्यवर मंडळी ज्यात पुढीलप्रमाणे, आत्माराम राठोड, सेवानिवृत डीएफओ, नागपूर, श्रीकांत राठोड, गोरसिकवाडी सहसंयोजक, महाराष्ट्र राज्य, मोहन चव्हाण साहेब, कृषि अधिकारी,.प्रा.वसंत पवार, गोपाल भाऊ, उदल राठोड, नायक गोरसिकवाडी नागपूर, सुदाम राठोड,राष्ट्रवादी काँग्रेस,व्ही जे एन टी सेल, अध्यक्ष नागपूर, नामा बंजारा, तांडा सुधार समिती,धर्मेद्र जाधव, तांडा सुधार समिती, पञकार होमसिंग पवार, राष्ट्रीय गोरआर्मी व मालुताई चव्हाण, नायकळ सौ.जयश्री राठोड, सौ.जयश्री दुलसिंग राठोड या कार्यक्रमाला वेळेतून वेळ काढून सर्व मंडळी उपस्थित होते मान्यवर मंडळीचा मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक होमसिंग पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञान प्रकाशचे श्रीपतभाऊ राठोड यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मद्र जाधव, बि.आर.राठोड, दिपाली राठोड व अंजली राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code