वरुड : वरुड तालुक्यातील ग्राम अमडापूर व तिवसाघाट येथे " तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत अमडापुर येथील " वार्ड क्रं १ मध्ये मनीष सावंत ते शिवनाथ सावंत यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम साठी तिन लक्ष रुपयांची तरतुद करुन देण्यात आली आहे. तसेच तिवसाघाट येथे " तांडा वस्ती सुधार योजना " अंतर्गत वार्ड क्रं.३ मध्ये विनोद देसली ते रामकृष्ण बांबल यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम साठी तिन लक्ष रुपयांची तरतुद करुन देण्यात आली आहे. या दोन्ही विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी भूमिपूजन सोहळ्याला आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळु कोहळे पाटील, पंचायत समिती सदस्य सिंधुताई कर्नाके, अमडापुर येथील सरपंच वैशालीताई गवई, तिवसाघाट येथील सरपंच केशवरावजी शिवणकर, उपसरपंच गणेशरावजी उघडे, उपसरपंच नितीन खापरे, सुचिताताई साबळे, पोलीस पाटील तानाजी सावंत, प्रकाश निकम, सुधाकर पाटील, प्रदीप सोनार, राजु पाटील, सारिका सोनारे, प्रताप खापरे, श्याम शिंदे, राजेंद्र साबळे, मंगेश तट्टे, रमेश कदम, काशिनाथ शिंदे, देवानंद सावंत, सुरेश सावंत, निलेश पाटील, ग्रा.पं.सदस्य, शारजाताई गजाम, वैशालीताई उघडे, मोहन लोणारे, सुनील विरूळकर, जिजाबाई शिवणकर, छायाताई झेले पोलीस पाटील,अनिल डिहारे, संजीव हिवनाते तसेच ग्राम तिवसाघाट, अमडापुर येथील नागरिक उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या