Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

"चला आनंद वाटू या" ला 6 वर्ष पूर्ण

    अमरावती : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला मेळघाट अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे, अतिदुर्गम भागातील समस्या निकाली निघाव्यात यासाठी शासनाने अनेक सामाजिक संस्थांना वाव दिला. शासन दरबारी नोंदणीत असलेल्या एनजीओ पैकी प्रत्येक एनजीओने एका गावात जरी उत्तम प्रकारे काम केले तरी समस्यां निकाली काढता येऊ शकतात. मात्र मेळघाटात आधार फाउंडेशन सारख्या दोन-चार सामाजिक संघटनांचे उत्कृष्ट कार्य सोडले तर उर्वरित संस्था काय करतात असा प्रश्न हि निर्माण होतो असे प्रतिपादन माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी आधार फाउंडेशनच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता तर सत्कारमूर्ती डॉ. शामसुंदर निकम, त्याचबरोबर जीवन सदार, दिलीप निंभोरकर, संत गाडगेबाबा मंदिर संस्थेचे अध्यक्ष शेंद्रे साहेब, अनिरुद्ध गावंडे, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थितीत होते.

    आधार फाउंडेशनचा "चला आनंद वाटू या"चा 6वा सेवापूर्ती सोहळा कोरोनाचे नियम पाळत खेळीमेळीच्या वातावरणात श्री संत गाडगेबाबा सभागृहात संपन्न झाला, या सोहळ्यात सर्वप्रथम स्व. पराग पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यांनतर राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हारार्पण करीत अभिवादन केले. नवनिर्मितीची आस पूर्णत्वास नेण्याचे सामर्थ्य आधारमध्ये होते आणि तसा विश्वास हि निर्माण झाला. जिल्हाभरात अनेक नागरिक उत्कृष्ट कार्य करीत असतात, त्यापैकी एका व्यक्तीचा सन्मान व्हावा या हेतूने आधार दरवर्षी त्या विशेष मान्यवराला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सन्मानित करत असते.

    शासकीय वैदकीय कार्यात कुणीही कार्य करायला तयार नसतात, मात्र डॉ.शामसुंदर निकम यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत प्रत्येक रुग्णांची सेवा करीत अतिशय अमूल्य सेवा कार्य केले, डॉ. निकम यांचा मान्यवराच्या उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला. डॉ. निकम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतांना आधार फाउंडेशन बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त करीत, आम्ही त्याच्या ऋणातंच राहण्याची इच्छा बोलतांना व्यक्त केली.

    "चला आनंद वाटू या" सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता उपस्थित होते. माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता गुप्ता यांनी तर आपल्या भाषणात अतिदुर्गम भागाचा पाढाचं वाचला, मात्र आधारला कार्य करण्याची नाविन्यपूर्ण प्रेरणा देऊन उपकृत केले, गुप्ता यांच्या अध्यक्षीय भाषणातून आधारला एक नव ऊर्जा प्राप्तीचं पाठबळ मिळालं. त्यासोबतच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी आधारच्या निर्मितीबाबत उलगडा केला, ते बोलतांना पुढे म्हणाले की आम्ही जेव्हा मेळघाटात प्रचारासाठी गेलो तर असं वाटत होतं की आदिवासी बांधवांची व नेसर्गिक भागातील आपत्ती झालेल्या नागरिकांची अवस्था पाहून आम्ही यांच्यासाठी काही तरी आणावं, त्याच्या समस्या समजून घ्याव्यात. त्यानुषंगाने संकल्पना आधारने स्वीकार केली, विशेष म्हणजे आजपर्यंत या आधारने शासनाची कुठलीही मदत न घेता "चला आंनद वाटू या" या सामाजिक कार्यातून मदतीचा हात पुढ केला आहे, मदतगार दानशुरांनी व नागरिकांनी आधारवर विश्वास ठेवत सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असे हि प्रदीप बाजड बोलतांना म्हणाले.

    या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रदीप बाजड, डॉ.अनिल ढवळे, प्रा.रामेश्वर वसु, प्रा.अनंत बाजड, प्रा.डॉ.चित्रा ढवळे, वैशाली बाजड, प्रा.अनुराधा बाजड, अरविंद विंचूरकर, महेंद्र शेंडे, दिपक खडेकर, संजय राऊत, सतीश क्षीरसागर, राजेश डीगवार, रामसेठ हरवानी, संजय खर्चे, सुरेश भारंबे, गजानन गाढवे, प्रा. डॉ. सुधीर बाजड, विशाल तिजारे, संदीप बाजड, अनिता काळे (बाजड), ऋषिकेश बाजड यांच्यासह आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप बाजड तर सूत्रसंचालन डॉ.अनिल ढवळे व आभार प्रदर्शन अनंत बाजड यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code