अमरावती, दि.29: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांची) येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत प्रवेश सत्र -2021 साठी एक तसेच दोन वर्षीय असे एकूण 27 व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी उद्या, शनिवार, दिनांक 30 ऑक्टोबरला आहे. ज्या उमेदवारांचा अद्यापपर्यंत प्रवेश निश्चित झाला नाही, अशा उमेदवारांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मेसन(बिल्डींग कन्ट्रशन) या व्यवसायामध्ये एकूण 20 जागा उपलब्ध असून या व्यवसायासाठी प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शिकाऊ उमदेवारी योजनेअंतर्गत रोजगारांची संधी उपलब्ध आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एल व टी कंपनीमध्ये तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगारांच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात तांत्रिक सहायक, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सेंटर रेल्वे, ऑर्डन्स फॅक्टरी येथेही नोकरीची संधी असते. तसेच ठेकेदारीचा परवाना मिळतो. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रवेश घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्रीमती एम. डी.देशमुख यांनी कळविलेले आहे.
—–