वरुड : वरुड शहरातील प्रभाग क्रं १ मध्ये गजानन धावडे ते चंदन उईके यांचे घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्याकरिता नगरपरिषद वरुड येथे अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत २७ लक्ष ९१ हजार २११ रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रं १ मध्ये उपासे ते दुपारे यांच्या घरापर्यंत काँक्रिट रोडचे बांधकाम करण्याकरिता नगरपरिषद वरुड येथील दलित वस्ती सुधारना योजने अंतर्गत ७ लक्ष ५१ हजार ४०८ रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे. या दोन्ही विकास कामांकरिता ३५ लक्ष ४२ हजार ६१९ रुपयांच्या करिता सदर कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!शहरातील विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.यावेळी भूमिपूजन सोहळ्याला आमदार देवेंद्र भुयार, नगरसेवक महेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळु पाटील कोहळे, सैयद गौस अली, स्वप्निल आजनकर, जंग्गु सिग भावे, सुशिल बेले, संकेत यावलकर, जगबीरसिंग भावे, निखिल बनसोड, अमित साबळे, संजय चाक्रपाणी, पुडलिक बासुडे, बंटी धरमठोक, जसमतसिंग भावे, शेख समिर, सतीश सातणकर, अमोल उईके, चेतन सोणेकर, ग्रोविद सिंग भावे, सुरज कासुरडे, कुणाल बेशरे, उपस्थित होते.
—–