• Mon. Sep 25th, 2023

वरुड तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते 2 हजार 850 आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप !

  वरुड : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वरुड तालुक्यातील 2 हजार 840 आदिवासी बांधवांना खावटी अनुदान योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के म्हणजे दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तर उर्वरित ५० टक्के अंतर्गत धान्य किराणा स्वरुपात खावटी कीट वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ योग्य व गरजू आदिवासींपर्यंत पोहचविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  सन २०१२ ला बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षी जंगलव्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्‍यक वस्तूंचे किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

  यावेळी बोलतांना आमदार देवेंद्र भुयार म्हणाले, मोर्शी वरुड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव असून खावटी अनुदान योजनेचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहचवून ठक्करबाप्पा योजने अंतर्गत, आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. यात भगवान बिरसा मुंडा शेतकरी स्वावलंबन योजना, शबरी घरकुल योजना आदींचा समावेश असून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा वरुड मोर्शी तालुक्यातील एकही आदिवासी कुटुंब खावटी अनुदान योजनेपासून व ईतर योजनांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

  वरुड तालुक्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते लिंगा, कारली, जामगाव, पिपलागड, वाई, मालखेड, सातनूर, रवाळा, माणिकपुर, खडका, बरगाव, नागझिरी, गोरेगाव, बेनोडा, पिंपळशेंडा, झटमझीरी, भेमडी, गव्हानकुंड, बहादा, टेंभुरखेडा, इसंबरी येथे ” खावटी अनुदान योजने ” अंतर्गत वरुड तालुक्यातील लाभार्थ्यांना किराणा किट वाटप आणि त्यांच्या खात्यात प्रत्येक दोन हजार रुपये अनुदान खात्यात जमा करण्यात आले.

  खावटी अनुदान योजनेंतर्गत असलेल्या कीट मध्ये आदिवासी लाभार्थ्यांसाठी किराणा स्वरुपात असलेल्या किटमध्ये १२ वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यात मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, शेंगदाने तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती चा समावेश आहे.

  खावटी अनुदान योजना अंतर्गत किराणा किट वाटप करतांना आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशपंत वडस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू पाटील, सरपंच रजनी कुबडे, हिरकांत उईके, अनिल काळभोर, रुपेश फुसे, विजय वडस्कर, शीतल बरडे, बंडू यावले, सुमित गुर्जर, रमेश श्रीराव, निलेश पाटील, प्रदीप शिरसाम, दिवकर उईके, निलेश नवडेक, चेतन वाडीवे, यशवंत वाडीवे, नथुजी आहाके, सुधाकर धुर्वे, निमशा वाडीवे, मारोती गजाम, यांच्यासह वरुड तालुक्यातील लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.


—–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,