अमरावती : सणासुदीच्या दिवसात व्यावसायिक मिठाई व फराळाच्या पदार्थांचे उत्पादन व विक्रीचे व्यवसाय सुरू करतात. अशावेळी अन्नसुरक्षा व मानके कायदयातील तरतुदींनुसार सर्व अन्न व्यवसायिकांनी परवाना किंवा नोंदणी घेणे बंधनकारक आहे. यामुळे अशा सर्व व्यावसायिकांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय सुरू करावा. असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त श.म.कोलते यांनी केले आहे.
परवाना व नोंदणीसाठी https:foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन आवश्यक शुल्क भरावे. अन्न व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे तसेच शुल्क वरील संकेतस्थळावर नमुद करण्यात आले आहे. याबाबत कोणतीही शंका किंवा अडचण असल्यास helpdesk-foscos@fssai.gov.in या ई मेल वर किंवा 1800112100 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या आदेशानुसार सुट्या (लुज) स्वरूपात विक्रीसाठी प्रदर्शित केलेल्या भारतीय पारंपारीक मिठाई या अन्न पदार्थाचे ट्रे किंवा कंटेनरवर बेस्ट बिफोर दिनांक टाकणे बंधनकारक आहे.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार मिठाई व्यवसायिकांनी नोटीस बोर्डवर मिठाईचे स्वरूप (घटक पदार्थ) लिहीणे करणे आवश्यक आहे. ही बाब ग्राहकहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक परवाना व नोंदणी आस्थापनेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावी. मिठाई उत्पादनाच्या ठिकाणी स्वछता ठेवावी. मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक खवा व इतर घटकपदार्थ परवाना व नोंदणीधारक आस्थापनाकडूनच खरेदी करवा.
अन्न व औषध प्रशासनातर्फे मिठाई विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी या तरतुदीचे पालन करावे. जे व्यावसायिक याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ग्राहकांना स्वछ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अमरावती विभागातील मिठाई व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
span class=”likebtn-wrapper”>
—–