• Tue. Sep 26th, 2023

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्याची मुदत आता 31 ऑक्टोबरपर्यंत

    मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत सूचना

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अमरावती : महाडीबीटी पोर्टलवर सन 2020 -2021 वर्षातील अनुसूचित जाती, विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे नवीन तसेच नूतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती , मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रम आणि संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात . यासाठी महाविद्यालयांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घ्यावेत . तसेच यात काही अडचण आल्यास ‘ सेंड बॅक ’ केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी त्वरित त्रुटी पूर्तता करून घ्यावी तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून विहीत काळात अर्ज भरून घ्यावे , असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.


—–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Related Post