• Thu. Sep 21st, 2023

पाऊसवार…!

    काय झाले कुणास ठाउक
    सारे झाले आपसूक भाउक
    देह असा लटकला तेंव्हा
    मृत किसानापरी गाव भाउक
    ……………………………..
    किसानाची दुःखरी गाथा
    किती उगाळावी रोज
    पाउस कसा उसवित जातो
    अन,हा आणतो त्सूनामी रोज
    ………………………….
    पिक भरात असता हा
    घेतो घास ना मुखिचा
    कितिक सोसावे त्याचे वार
    हा वाखा करी किसानांचा
    ……………………………..
    या निर्सगाला काय म्हणावे
    त्याचे तर मनमौजी राज
    व्यथित आपण सारे आज
    ना पिकीची मग पडते गाज
    ……………………………..
    दुःखभारली सांज कशी
    घूटमळते गाव शिवारात
    मेघ दाटले काळे कुट्ट
    होईल संहारी बरसात
    ……………………………..
    वेदनेचे कीनारे घेवून
    उध्वस्त करी हा घरदार
    पडतो आक्रस थेंब धार
    गाव शांत विझनात
    ……………………………..
    कौलात घरात अंगणी
    हा सर्वदूर विसावते पाउस
    कोणाला असे मरणाची
    ईथे नाहक ही हाउस.
    ……………………………..
    किती झेलावे त्याने
    भयकंपित कापरे वार
    मुक्तांगणि किसान मरतो
    खावूनी विष ते असरदार.
    ……………………………..
    – शिवा प्रधान
    अमरावती
    मोबा :7057605968

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,