- अजून किती छळतो बाबा
- किती आवळतो तू फास
- हातातोंडाशी आलेला रे
- कसा न्यावा वाटतो घास
- किती कष्ट घेतले होते
- तळहातावर होते जपले
- मेहनत किती घेतली राजा
- रात्रंदिवस होते रे खपले
- कसा बरसतो धुंवाधार
- दाणादाण उडवून जातो
- तुला कसं कळणार राजा
- मी किती रे गारद होतो
- कसे जगवू लेकरं बाबा
- कसा वाहू कुटूंबाचा भार
- ऐनवेळी कसा द्यावा वाटतो
- जीवघेणा मुक्का रे मार
- सणासुदीचे दिवस आले
- हौस कशी रे पुरवायची
- बुडाल्या गंज्या पाण्यात
- दिवाळी कशी रे करायची
- परत जात असतानाही
- आज करून गेला घोर
- कसा चालवायचा संसार
- गळ्यात सोडून गेला दोर
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१
—–
(Images Credit : Sakal)
Contents hide