गेली दोन वर्ष आपण कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहोत.या अचानक आलेल्या महामारीने शहरीसह ग्रामीण भागातील अनेकांचे प्राण हिरावले,यामागे अतिमहत्वाचा मानवी जीवनावश्यक घटक म्हणजे आॅक्सीजन.याची कमतरता या काळात आपल्याला भासली आणि सर्व स्तरांतील लोकांना निसर्गाची किंमत कळाली.जो तो गर्दी टाळून राहणे पसंत करू लागला आणि माणूस माणसाला घातक ठरला तो एका संसर्गजन्य विषाणूंमुळे,यांचा नियमच होता कि अंतर ठेवून रहाणे.सबंध मानवाने ग्राम भागासह-निसर्गात राहणे पसंत केले.
२३ आॅक्टोबरला असाच एक निसर्गाधारीत सौ.वर्षा चिमणाजी केंद्रे-मुंडे यांचा ” माझा निसर्ग ” हा काव्य संग्रह प्रकाशित झाला.पुस्तकाचं मुखपृष्ठच निसर्गाबद्दलच सार सांगून जात असलं तरी आतील कविता या नक्कीच वाचनीय आहेत. मुखपृष्ठावरील निसर्ग या ग वरील रफार हा इंद्रधनुचा दिल्याने वाचक हर्षित,मोहित झाल्याशिवाय रहात नाही.यावर दिलेले निसर्गचित्र हे प्रत्येकाने शालेय वयात अशाच प्रकारे रेखाटले आहे,हा बाल्यावस्थेतील अनुभव जागृत झाल्याशिवाय रहात नाही.नदि,त्याच्या एका किनारी असलेली घरे,लहान मुले,उंच झाड,सतत बैलगाडीच्या ये जा केल्याने तयार झालेला रस्ता,घरामागील दाट हिरवळ,त्या झाडाच्या एका फांदिवर बसलेले दोन पक्षी,त्याच किनारी गवताच्या पातीवर हितगुज करणारा पक्षी आणि बगळा त्यातील कमळ.दुसय्रा किनारी शेतीक्षेत्र,त्यात कामासाठी सज्ज बैलजोडी शेतकरी,मोठा वृक्ष,दुर दिसणारे डोंगर, धबधबा,सुर्योदय होतोय आणि पक्षांनी घेतलेली मुक्त भरारी.हे सध्या सगळीकडे झालेल्या पावसाचं प्रतिक या मुखपृष्ठावर घडवलेले आहे.
कवयित्रीची अर्पनपत्रिका ही आईसह पती,गुरू, हितचिंतक व दोन्ही मुलांना हि कलाकृती अर्पन केली आहे.कवयित्रीची निसर्गप्रार्थना म्हणजे तिने मनापासुनच केलेलं सर्वजनांना निसर्ग जपण्याचं आव्हान,कारण ते देवता आहे आणि भारतीय लोक हे निसर्गपुजक आहेतच हे सर्वज्ञात आहे.प्रा.डाॅ.राजेंद्र दास सरांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे.तसेच कुर्डूवाडी येथीलच कवयित्री निलावती कांबळे यांच्या शुभेच्छा आहेत.कवयित्रीच्या मनोगतातूनही निसर्गप्रेम व अतुट नातं ओतप्रोत वाहते यांचं जाणीव आपल्याला होते.
हा फक्त निसर्ग काव्यसंग्रह नसून मनाला जागीच पर्यटन करून आणणारा असा काव्यसंग्रह आहे.कवयित्री या जरी जास्त करून शहरी भागात वास्तव्यास असल्या तरी त्यांच्या काव्यरचनेने त्यांची नाळ अद्यापही ग्रामीण भागाशी जाणीवेने जोडलेली आहे. निसर्गाचं कौतुक करताना पर्यावरण संवर्धन करण्याचंही कवयित्री सांगतात.त्यामुळे काव्यसंग्रह हा आपल्या जीवनाचा ते जगण्याचा एक अविभाज्य भाग बनतो.नकारत्मकतेतून सकारात्मकतेकडे नेणारा हा काव्यसंग्रह नक्कीच कौतुकास्पद आहे.
या काव्यसंग्रहात एकुण छपन्न कवितांचा समावेश आहे आणि चौसष्ट पृष्ठ आहेत.” एक झाड लावू ” या कवितेने कवयित्रीचं सर्वांना आव्हान केलं आहे.द्रोण,अष्टाक्षरी,आठोळी,मधुसिंधु,त्रिवेणी,मधुदिप अशा सुंदर काव्यप्रकार व रचना आपल्याला वाचायला मिळतात.बसल्या ठिकाणापासून कवयित्री पर्यटनाला नैसर्गिक ठिकाण,तसेच ग्रामीण भागात घेऊन जाते.यातील चित्र प्रत्येक कवितेस अनुरूप व आकर्षक आहे.ती रंगीत असायला हवी होती पण दुसय्रा आवृत्तीत त्याची पुर्तता नक्कि होईल अशी आशा करतो.प्रत्येकाने हा संग्रह वाचावा असाच आहे, आपल्या घरातील संग्रहात यांचा जरूर समावेश करावा.जी लहान मुले चाकोरीतच सतत असतात त्या मुलांकरिताही तो तितकाच उपयोगी आहे. याआधी “शब्दलेखणी”चारोळी संग्रह,” निसर्ग”,”जय महाराष्ट्र”,”काव्यराज”असे काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत.
- विशाल गौरीशंकर पवार
- रा.कुर्डूवाडी ता.माढा जि.सोलापूर
- मो.नं.७६२०००२९९६
- मेल-: vishalpawarg@gmail.com
- ————-
- प्रकाशन-:कोठावळे प्रकाशन,ठाणे
- काव्यसंग्रह-:माझा निसर्ग
- कवयित्री-:सौ.वर्षा चिमणाजी केंद्रे-मुंडे
- पृष्ठ-:६४ मुल्य-:१४९ /- रू.
—–