- दीक्षा भूमीवर जाऊन सखये ।
- माथा टेकून आज येऊ ग ।
- बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचे
- पालन सारेच करू ग ।
- बाबासाहेबांनी त्यागीला हिंदू धर्म ।
- ते जाणिले दिक्षेचे मर्म ग ।
- लोप पावलेला तो बुद्ध धम्म ।
- पुन्हा रुजविला जनमानसात ग ।
- श्वेत शुभ्र वस्त्र ते लेऊनी ।
- वंदन तयास करू ग ।
- कोटीकोटी उपकार करुनी ।
- दिले भारतास संविधान ग।
- बोधिवृक्षाची सुमधूर फळे।
- सारे चवी ने आज चाखू ग ।
- विसरुनी आता बेकी ।
- धम्म तळे आज राखू ग।
- आज वाटे मनी खूप हर्ष ग ।
- मन दाटून आले वर्षा चे ग ।
- बौद्ध धम्माची दीक्षा द्यावया ।
- येतील का आज भीमराज ग ।
- सौ. वर्षाताई राज इंगळे
- जिल्हाध्यक्ष अ.भा.म. सा. प. बुलढाणा
- संपर्क 9552057962
—–