- दिवाळीची लगबग
- बघा झाली सुरू
- यंदा थोडी वेगळीच
- दिवाळी साजरी करू
- गरीब व्यापाऱ्यांकडून
- पणती घेऊ मातीची
- कौतुक करून थोडेसे
- रुपये दोन देऊ जास्तीची
- रुचकर फराळ सुद्धा
- करु जास्तीचा वाढवून
- अनाथ आश्रममध्ये जाऊ
- पॅकेट्स फराळाचे घेऊन
- लाजू नका वस्तू घ्यायला
- जेष्ठ किंवा गरीबाकडून
- एक तिथे दोन वस्तू नक्की
- खरेदी करू आवर्जून
- प्रदूषण यूक्त फटाके
- यंदा घेणे मुद्दाम टाळावे
- त्याच पैशाचे मदतीचे दान
- गरीबाच्या पदरी टाकावे
- आकाशकंदील होऊनी
- इतरांसाठी उजळून जाऊ
- गोरगरिबांच्या दिवाळीचे
- आपण मात्र निमित्त होऊ
- – आम्रपाली घाडगे
- मिरा रोड, मुंबई
—–
Contents hide