- कविता अशी नाही सुचत कधी
- त्याच्यासाठी रोज तपावं लागते ।
- हसलेल्या माणसाचेही अंतरंग
- काय म्हणते ते टिपावं लागते ।।
- सोफ्यावर बसून आराम मिळेल
- कविता नाही ना रे तुला सुचणार ।
- गरिबांच्या घावाला अनुभविण्या
- त्यांच्यासारखं जगावं लागणार ।।
- लिहायला जमते म्हणून काहीही
- लिहणे कशाला कुठे रे चालते? ।
- अनुभव आल्याशिवाय लेखणी
- चालायला सुद्धा बघ डगमगते ।।
- मनातून लिहणे आणि वरवरचे
- दोघात फरक क्षणात जाणवतो ।
- दुःखी असणाराच नेहमी जनाला
- हसवण्यासाठी प्रयत्न करतो ।।
- स्वतःसाठी काही मागू नको तू
- तूच बन रे या जगासाठी आधार ।
- बाहेर जाऊन थोडा निरीक्षण कर
- बघ ना युवा आहेत इथे बेरोजगार ।।
- मेहनतीला न्याय मिळविण्या लढ
- परस्त्रीलाही बनव तू आपली ताई ।
- अरे, धीर नको सोडू कर्म करत जा
- फळाला येईल तुझी नक्कीच पुण्याई ।।
- -अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७
Thank you for reading this post, don't forget to subscribe!